मुंबई: अनेक मराठमोळ्या कलाकारांनी जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यातच आता मराठवाड्यातील बीडचा अभिनेता नंदू माधवचाही समावेश झाला आहे. कारण नंदू माधवने थेट गुगलच्या जाहिरातीमध्ये अभिनयाची झलक दाखवून, सर्वांना भावूक केलं आहे.

 

गुगलने सुमारे सहा मिनिटाची नवी जाहिरात प्रदर्शित झाली आहे. पावलोपावली गुगल सर्च तुम्हाला किती उपयुक्त ठरु शकतं, हे या जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे.



या जाहिरातीमध्ये नंदू माधव यांनी एका पित्याची भूमिका साकारली आहे. तर मसान चित्रपटातील अभिनेता विकी कौशल त्यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे.

 

चित्रपटात भूमिका साकारण्याचं स्वप्न असलेल्या वडिलांची इच्छा, मुलगा गुगलच्या मदतीने कसा पूर्ण करतो, हे या जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे.