OPPO Enco Buds2 India Launch : स्मार्टफोन (Smartphone) ब्रँड कंपनी Oppo चे स्मार्टफोनला तर तरूणाईची विशेष पसंती मिळतेच. पण, आता ओप्पोने (Oppo) आपले नवीन ब्लूटूथ इयरबड्स OPPO Enco Buds2 भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. या इअरबड्समध्ये 10 मिमी टायटॅनियम डायनॅमिक ड्रायव्हरसह पॉवरफुल BASS आहे. या बरोबरच उत्कृष्ट साऊंड क्वालिटीसाठी AI नॉईज रिडक्शन अल्गोरिदम देण्यात आला आहे. इयरबड्सना (Earbuds) वॉटर रेसिस्टंटसाठी IPX4 रेटिंग आहे. या इअरबड्सच्या इतर फिचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

  


OPPO Enco Buds2 चे स्पेसिफिकेशन (Features & Specifications) : 



  • Oppo च्या OPPO Enco Buds2 मध्ये 10 mm टायटॅनियम डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, जे Dolby Atmos आणि Enco Live स्टिरीओ साउंड इफेक्टसह येतात.

  • OPPO Enco Buds2 मध्ये तीन प्रकारचे ऑडिओ सेटिंग ओरिजिनल, BASS बूस्ट आणि क्लियर व्होकल समर्थित आहेत.

  • कंपनीने दावा केला आहे की या इयरबड्सना डीप न्यूरल नेटवर्क (DNN) आधारित AI नॉइज रिडक्शन अल्गोरिदम मिळतो, जो त्याच्या कॉलिंगमध्ये सुधारणा करण्यास सक्षम आहे.

  • OPPO Enco Buds2 ला पाणी आणि धूळ प्रतिरोधकांसाठी IPX4 रेटिंग आहे.

  • OPPO Enco Buds2 मध्ये ब्लूटूथ v5.2 आणि लो-लेटन्सी आहे. 


OPPO Enco Buds2 बॅटरी (Battery Details) :


OPPO Enco Buds2 मध्ये बॅटरी बॅकअप देखील चांगला देण्यात आला आहे. OPPO Enco Buds2 मधील केससह, तुम्हाला एका चार्जमध्ये 28 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. कंपनीने असा दावा केला आहे की, केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हे इयरबड्स 1 तास चार्ज होऊ शकतात. 


OPPO Enco Buds2 ची किंमत (Check Price) :


या इयरबड्सची किंमत पाहता इतर इयरबड्सच्या तुलनेत साधारण कमी किंमतीत आहे. OPPO Enco Buds2 ब्लूटूथ इयरबड्स 1,799 रुपये आहे. 31 ऑगस्टपासून ग्राहक हे इयरबड्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर, OPPO स्टोअर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून सहज खरेदी करू शकतात.


महत्वाच्या बातम्या :