8 जानेवारी आणि 9 जानेवारी या दोन दिवशी स्नॅपडीलचा ‘वेलकम 2017’ सेल आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सकडून कोणत्या ऑफर जाहीर होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. अखेर आज (शनिवार) स्नॅपडीलने ‘वेलकम 2017’ सेल जाहीर करत इतर ई-कॉमर्स वेबसाईटच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
‘वेलकम 2017’ सेलमध्ये स्मार्टफोनची किंमत किती?
- रेडमी नोट 3 – 11 हजार 999 रुपये
- सॅमसंग J2 प्रो (16 जीबी) – 9 हजार 490 रुपये
- आयफोन 5s (16 जीबी) – 17 हजार 499 रुपये
- आयफोन 7 (32 जीबी) – 52 हजार 999 रुपये
- आयफोन 6s (32 जीबी) – 43 हजार 999 रुपये
ग्राहकांकडे एसबीआय क्रेडिट कार्ड असल्यास 15 टक्के अधिकची सवलत मिळवू शकतात. नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेकजण वेगवेगळी खरेदी करत असतात. त्यामुळे सवलती किंवा ऑफरमधील वस्तूंनाही अनेकदा पसंती दिली जाते. त्यामुळे स्नॅपडीलचा ‘वेलकम 2017’ सेल ग्राहकांना पर्वणीच ठरणार आहे.