अॅपलकडून टिम कूक यांच्या वेतनात 15 टक्क्यांनी कपात
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2017 01:12 PM (IST)
नवी दिल्ली : आयफोनच्या विक्रीत घट होऊन कंपनीला नुकसान झाल्यामुले अॅपलने सीईओ टिम कूक यांच्या वेतनात तब्बल 15 टक्क्यांनी कपात केली आहे. 15 वर्षात पहिल्यांदाच जगभरात आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे. विक्री घटल्याने कंपनीचा व्यवसाय 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. अॅपलकडून 2007 पासून जगभरात आयफोनची विक्री केली जाते. दरम्यान टीम कूक यांच्या वेतनात कपात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 2015-2016 मध्ये टीम कुक यांचं वेतन 1.3 कोटी यूएस डॉलर एवढं होतं, तर यावर्षी वेतन 87 लाख यूएस डॉलर एवढं करण्यात आलं आहे.