मुंबई : केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी अनेकवेळा ट्विटरवॉरमध्ये अडकल्याचं नेटिझन्सनी अनुभवलं आहे. यावेळी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षणमंत्री डॉ. अशोक चौधरी यांनी ट्विटरवर स्मृती इराणींना 'डिअर' संबोधल्याने त्यांचा संताप झाला.
डिअर स्मृती इराणीजी, कधी राजकारण आणि भाषण यातून वेळ मिळालाच तर शैक्षणिक गोष्टींकडेही लक्ष द्या असं चौधरींनी ट्वीट केलं होतं. यावर उत्तर देताना 'अशोक चौधरी जी महिलांना डिअर संबोधित कधीपासून करायला लागलात' असा सवाल केला.
https://twitter.com/AshokChoudhaary/status/742597392332029952
स्मृती इराणींच्या या प्रत्युत्तरानंतरही अशोक चौधरींनी स्वतःची बाजू लावून धरली. 'अपमानाचा हेतू नाही, मात्र प्रोफेशनल इमेल्स हे डिअर या संबोधनानेच सुरु होतात. कधीतरी मुद्द्यावर उत्तर द्या. नेहमीच इकडे तिकडे भरकटत जाऊ नका.' असं ट्वीट केलं.
मात्र स्मृती इराणी यावरच थांबल्या नाहीत. माझं प्रत्येक संभाषण हे आदरणीय या शब्दाने सुरु होता, असं लंगडं समर्थन त्यांनी केलं. मात्र ट्विटराईट्स डोळ्यात स्मृती इराणी खुपल्याच. स्मृती इराणी यांनी पूर्वीच्या ट्वीट्समध्ये कोणाकोणाला डिअर संबोधलं आहे, डिअर संबोधण कसं प्रोफेशनल वागणुकीचं लक्षण आहे, किंवा पंतप्रधान मोदींनी कशाप्रकारे इतर महिलांना ट्वीटमध्ये डिअर संबोधलं आहे, हे ट्वीट्स होऊ लागले.