मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टचे प्रॉडक्ट खरेदी करण्याआधी आता तुम्हाला दोनदा विचार करावा लागणार आहे. कारण प्रॉडक्ट रिटर्नमुळे कंटाळलेल्या फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या प्रॉडक्ट रिटर्न पॉलिसीमध्ये बदल केला आहे. शिवाय, फ्लिपकार्ट आता वेंडर्सकडूनही अधिक कमिशन वसूल करणार आहे.

 

नव्या नियमांनुसार, प्रॉडक्ट रिटर्न करण्यासाठी याआधी 30 दिवसांची मुदत होती. मात्र, आता ही मुदत कमी करुन 10 दिवसांवरुन आणली आहे. म्हणजे तुम्ही एखादं प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर, जर तुम्हाला त्यात काही दोष आढळल्यास रिटर्न करायचं असल्यास केवळ 10 दिवसांत रिटर्न करावा लागेल. कपडे आणि दगिन्यांना या नव्या नियमांतून फ्लिपकार्टने वगळले आहे.

 

याआधी अमेझॉन इंडियानेही आपल्या रिटर्न पॉलिसीमध्ये बदल केले होते. अमेझॉननेही प्रॉडक्ट रिटर्नची मुदत 10 दिवसांची केली आहे.

 

एका इंग्रजी वृत्तापत्राच्या वृत्तानुसार, फ्लिपकार्ट आपली नवी प्रॉडक्ट रिटर्न पॉलिसी 20 जूनपासून लागू करणार आहे.