मुंबई : स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे सुरक्षेचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महत्त्वाच्या ब्लॅकबेरी स्मार्टफोनला रामराम करावा लागत आहे.


 

'टूनाइट शो' या एका खासगी वाहिनीच्या टिव्ही शोमध्ये सहभागी होताना ओबामा यांनी जिमी फेलॉन यांना यासंदर्भात माहिती दिली. यानुसार, त्यांना एक नवीन यंत्र देण्यात आले आहे. सुरक्षेच्या काराणांमुळे हे यंत्र कोणाचेही फोटो काढू शकत नाही, शिवाय यावरून फोन किंवा मॅसेजही पाठवता येत नाहीत.

 

लहान मुलांना देण्यात येणाऱ्या प्ले फोनसारखेच हे यंत्र असल्याचे ओबामांनी या टिव्ही शोदरम्यान सांगितले.

 

अॅन्ड्राइड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीमच्या स्मार्टफोनने गेल्या काही दिवसात ब्लॉकबेरीला पूर्णपणे हद्दपार केले आहे. अॅन्ड्राइड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीममार्फत कूटनीतीचे संदेश सुरक्षितपणे पाठवले जात असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांना जाणवत आहे.

 

व्हाइट हाऊसमधील काही अधिकाऱ्यांनाही अॅपलच्या आयफोनपासून दूर करण्यात आल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाईम्सने दिले होते.

 

2008 मध्ये अमेरिकन सुरक्षा एजन्सी एनएसएने ओबामांना वैयक्तिक वापरासाठी ब्लॉकबेरी फोन दिला होता. या फोनमध्ये सेक्यूअर व्हाइस नावाचे सॉफ्टवेअर बसवण्यात आले होते. तसेच या फोनमधील सर्व फिचर्सही सुरक्षेच्या कारणास्तव काढून टाकण्यात आले होते.