Smartwatch Tips : देशात सध्या स्मार्टफोन व्यतिरिक्त स्मार्टवॉचचा ट्रेंडही खूप वाढला आहे. तरुण असो वा वृद्ध, प्रत्येकाला स्मार्टवॉच आवडते. अनेक कंपन्या विविध फीचर्ससह स्मार्टवॉच देत आहेत, ज्यातून तुम्ही हेल्थ मॉनिटर करु शकता. जर तुम्ही देखील स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही कमी किंमतीत चांगले प्रोडक्ट निवडू शकाल.

Continues below advertisement


अॅडव्हान्स फीचर्स तपासणे आवश्यक


सध्या, स्मार्टवॉच अनेक उत्तम फीचर्ससह उपलब्ध आहेत. याद्वारे, आपण हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि आपल्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवू शकता. एवढेच नाही तर झोपताना तुम्ही स्मार्टवॉच घालून स्लीपिंग सायकल देखील मॉनिटर करू शकता. म्हणूनच स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी अॅडव्हान्स फीचर्सविषयी संपूर्ण माहिती मिळवा.


SmartWatch side Effects : स्मार्टवॉचने आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात?


स्मार्टफोनशी कनेक्ट होणारे स्मार्टवॉच


चांगले स्मार्टवॉच तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होतात आणि तुम्ही त्यांच्याद्वारे तुमचे कॉल आणि मेसेज कंट्रोल करू शकतात. या व्यतिरिक्त, आपण त्यातून म्युझिक देखील कंट्रोल करू शकता. जर तुमचे बजेट चांगले असेल तर उत्तम फीचर्ससह येणारे स्मार्टवॉच खरेदी करा.


वॉटरप्रुफ स्मार्टवॉच अधिक चांगले


कधीकधी स्मार्टवॉचेस घातलेले असताना पाण्याशी संपर्क येतो. अशा स्थितीत स्मार्टवॉच खराब होण्याची भीती आहे. म्हणूनच तुम्ही वॉटरप्रूफ स्मार्टवॉच खरेदी केले पाहिजे. यासह तुम्ही काळजी न करता कोणतेही काम करू शकता. उन्हाळ्यातही घाम आला तरी अशा स्मार्टवॉचवर ते परिणाम करत नाही.


स्मार्टवॉचचा जास्त वापर धोकादायक


बरेच लोक दिवस -रात्र स्मार्टवॉच घालतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्मार्टवॉचमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे डोकेदुखी होऊ शकते. याशिवाय, स्मार्टवॉच पुन्हा पुन्हा पाहू नये. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. स्मार्टवॉच एका मर्यादेत वापरायला हवं.