मुंबई: रिंगींग बेल कंपनीचा फ्रिडम 251 हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन अद्यापही ग्राहकांच्या हाती आलेला नसताना आता अवघ्या 99 रुपयातील स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरुमधील नमोटल कंपनी स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.

 

या स्मार्टफोनची किंमत फारच कमी ठेवण्यात आली आहे. बंगळुरुमधील नमोटेल कंपनीनं नमोटेल अच्छे दिन नावानं हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची किंमत अवघी 99 रु. आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

 

कंपनीचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, या स्मार्टफोनची प्री बुकींग 17 मे ते 25 मेपर्यंत namotel.com या वेबसाइटवर  करता येणार आहे. पण सध्या वेबसाइट सुरु होत नसल्याचं आढळून आलं आहे.

 

हा फोन बुकींग करण्यासाठी यूजरला bemybanker.com वेबसाइटवर जाऊन आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर यूजरला आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. ज्याच्या मदतीनं namotel.com वर स्मार्टफोन बुक करता येणार आहे. नोंदणीसाठी यूजरला एकदा लाइफ टाइम मेंबरशीप फी 199 रु. भरावी लागणार आहे.

 

नमोटेल अच्छे दिन स्मार्टफोनचे फीचर्स:

 

4 इंच डिस्प्ले, 480x800 पिक्सल

 

5.1 अँड्रॉईड लॉलिपॉप ओएस

 

1 जीबी रॅम, 4 जीबी मेमरी, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल.

 

2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि VGA सेल्फी कॅमेरा

 

ड्यूल सिम सपोर्ट

 

3जी कनेक्टिव्हिटी  

 

कंपनीच्या वेबसाइटवर याची किंमत 2,999 रु. आहे. मात्र याच्या किंमतीत कपात करण्यात आली असून आता हा स्मार्टफोन अवघ्या 99 रुपयात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कॅश ऑन डिलिव्हरीवर देखील खरेदी करता येणार आहे.

 

पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया या मोहिमेत सहभागी होऊन त्याविषयी आदर असल्यानं हा स्मार्टफोन तयार करण्यात आला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

 

 

संबंधित बातम्या:

 

फोटो गॅलरी: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन नमोटेल अच्छे दिन लाँच, किंमत 99 रुपये!