मुंबई: स्कोडा कंपनीनं आपल्या 539 ऑक्टाव्हिया कार परत मागवल्या आहेत. चाइल्ड लॉकमधील बिघाडामुळे या कार परत मागवण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.
या कारची विक्री नोव्हेंबर 2015 ते एप्रिल 2016मध्ये करण्यात आलं आहे. यासाठी कंपनी कोणतंही शुल्क आकारणार नाही. ही दुरुस्ती कंपनीकडून मोफत करुन मिळणार आहे.
कंपनीच्या मते, हा समस्येची निरिक्षण अवघ्या 12 मिनिटात करण्यात येणार असून जर चाइल्ड लॉक बदलण्याची गरज वाटली तर त्यासाठी अवघी 45 मिनिटं लागणार आहे. त्यामुळेच कंपनीनं या गाड्या रिकॉल करण्याचे डीलर्संना आदेश दिले आहेत.
स्कोडा ऑक्टाव्हियाचे दोन व्हेरिएंट हे पेट्रोल आणि एक व्हेरिएंट डिझेल इंजिनमध्ये लाँच करण्यात आले होते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.4 लीटर आणि 1.8 लीटर टर्बो इंजिन देण्यात आलं आहे. तर डिझेल व्हेरिएंट 2.0 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. या कारमध्ये टचस्क्रीन इंफोन्टेमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याच्या बेसिक मॉडेलची किंमत 16.6 लाख आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 22.4 लाख आहे.