नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे सर्वेसर्वा सुनील भारती मित्तल यांना वार्षिक 30 कोटी रुपये पगार मिळणार आहे. मित्तल यांची कंपनीच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.

 

सुनील मित्तल यांनी 21 कोटी रुपये वार्षिक पगार आणि कामाशी संबंधित इतर खर्चासाठी 9 कोटी रुपये, असे मिळून एकूण 30 कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील मित्तल यांच्या या पगाराला कंपनीच्या 19 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या 21 व्या सर्वसाधारण बैठकीत मंजुरी देण्यात आली. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, 2015-2016 मध्ये 27.8 कोटी वार्षिक पगार आणि 1.17 कोटी रुपये इतर खर्चासाठी होते. या पॅकेजमध्ये सर्वसाधारण बैठकीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.