नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय हे अॅप सुरु केलं आहे. या अॅपवरुन तुम्ही क्षणार्धात पैसे पाठवू शकाल.
आरबीआयने युनिफाईड पेमेंट सिस्टीम नावाच्या प्रणालीला आपला हिरवा कंदील दिला आहे. यानुसार ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनवर UPI हे अॅप डाऊनलोड करुन, याद्वारे विविध बँकांमधली खात्यात रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे.
एखाद्या एटीएम कार्डाप्रमाणे या अॅपचा वापर करता येणार आहे. रक्कम ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाला आपल्या खात्याच्या माहितीऐवजी आपलं युजरनेम शेअर करावं लागणार आहे.
त्यामुळे आगामी काळात यूपीआय अॅपद्वारे डिजीटल बँकींग करणं अधिक सोपं होणार आहे.
पैसे कसे पाठवायचे?
*यूपीआय अप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागले. त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडावं लागेल.
*तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल.
*सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.
*या अपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.