मुंबई : घरगुती वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय स्कॉर्पिओ या गाडीचं हायब्रिड वर्जन बाजारात आणले आहे. या मॉडेलची किंमत 9.74 लाखांपासून ते 14.01 लाखांपर्यंत नवी मुंबई शोरूममध्ये असेल.


 

कंपनीचं म्हणणं आहे की या मॉडेलमध्ये बुद्धिमत्तापूर्ण हायब्रिड इंजिन देण्यात आले असून याने इंधनाची 7 टक्क्यापर्यंत बचत होणार आहे. कारण हे तंत्रज्ञान इंजिनला गति देण्यासाठी इलेक्ट्रीक शक्तिचा वापर करते. तसेच यात गाडी बंद असताना इंजिन तात्पुरते बंद होत असल्यामुळे गाडी एका जागी बराच वेळ उभी राहिल्यास इंजिन आपोआप बंद होते आणि पुन्हा सुरू होण्यासाठी ब्रेक उर्जेचा वापर करते.

 

या स्कॉर्पिओमध्ये वापरल्या गेलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इंधनाची बचत होते तसेच पर्यावरणला होणाऱ्या हानीला आटोक्यात आणते.