सचिन बनून स्मार्टफोनवर क्रिकेट खेळण्याची संधी
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2016 07:47 AM (IST)
पुणे: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता गेमिंगच्या विश्वातही पाहायला मिळणार आहे. सचिनच्या कारकीर्दीवर आधारीत गेमचा टेलर नुकताच लाँच झाला आहे. सचिन सागा हा स्मार्टफोन गेम असून पुण्यातील जेटसिंथेसिसच्या मालकीच्या प्लेइजऑन टेक्नॉलॉजी या गेमिंग कंपनीनं तो तयार केला आहे. या गेममध्ये चाहत्यांना सचिन बनून स्मार्टफोनवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. अँड्रॉईड, आय फोन आणि विंडोज फोनवर पुढील पाच ते सहा महिन्यांत हा गेम उपल्बध होईल.