मुंबई: स्वाइप टेक्नॉलॉजीने आपला नवा Konnect प्लस हा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या ब्लॅक रंगाच्या वॅरिएंटसोबत बाजारात उपलब्ध असून तुम्ही तो फ्लिपकार्टवरून 4,999 रुपयांना  खरेदी करू शकता.

 

या नव्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले असून, त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1280 x 720 पिक्सेल आहे. तसेच यामध्ये 1.2GHz क्वार्डकोर प्रोसेसरसोबतच 2 GB रॅम असेल. इंटरनल स्टोरेजसाठी यामध्ये 16 GBची मेमरी देण्यात आली असून, ती 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

 

याशिवाय, या स्मार्टफोमध्ये 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्यूअल सिमसोबतच अॅन्ड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.

 

कनेक्टिविटीसाठी यामध्ये 3G, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.