नवी दिल्ली : सॅमसंगने तीन कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए-7 फोन लॉन्च केल्यानंतर आता कंपनी नवीन फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. येत्या 11 ऑक्टोबरला सॅमसंग चार कॅमेरा असलेला फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र याबाबत सॅमसंगकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सॅमसंगने या नवीन स्मार्टफोनबाबतचं इन्वाईट मीडियाला पाठवणं सुरू केलं आहे. ज्यामध्ये '4X Fun A Galexy Event' असं लिहिलं आहे. सॅमसंग या फोनला 11 ऑक्टोबरला मलेशियामध्ये लॉन्च करणार आहे. मात्र या नव्या फोनमध्ये काय नवी फीचर्स असतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सॅमसंग गॅलेक्सी ए-7 ट्रिपल लेन्स कॅमेरा
सॅमसंगच्या गॅलेक्सी ए-7 फोनला ट्रिपल कॅमेरा लेन्स रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 24 मेगापिक्सलची लो लाईट सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 मेगपिक्सलच्या वाईड अँगल सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचं डेप्थ सेन्सर इफेक्ट देण्यात आहेत. तसेच या फोनला 24 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.
गॅलेक्सी ए-7 मध्ये अॅग्जिनॉस 7885 प्रोसेसरची सुविधा देण्यात आली आहे, जी 2.2 ghz प्रोसेसरसोबत येते. या फोनमध्ये दोन मेमरी आणि रॅम ऑप्शन देण्यात आले आहेत. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची किंमत 23,990 रुपये आहे.
तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 28,990 रुपये आहे. दोन्ही फोनची मेमरी 512 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे.