मुंबई : या महिन्यात ई कॉमर्स वेबसाईट मेगा सेलचं आयोजन करणार आहेत, ज्यामध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम यांचा समावेश आहे. या सेलमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी आणि भरघोस डिस्काऊंट मिळणारी वस्तू असेल ती म्हणजे स्मार्टफोन. अनेक ग्राहक ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी करतात. त्यामुळे ऑनलाईन फोन खरेदी करताना काही गोष्टी तुम्हाला माहित असणंही गरजेचं आहे.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
विविध वेबसाईटवर किंमत पाहा : बाजारात अनेक वेबसाईट आहेत, ज्या एकच वस्तू विविध किंमतीत विकतात. त्यामुळे तुम्ही जी वस्तू घेणार असाल, ती विविध वेबसाईटवर तपासून पाहा. कदाचित एखाद्या वेबसाईटवर स्वस्त किंमतीतही ती वस्तू मिळू शकेल.
रेटिंग आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया : अनेक वेबसाईट थर्ड पार्टीच्या मदतीनेही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रोडक्टविषयीचे रेटिंग आणि ग्राहकांनी दिलेले रिव्ह्यू म्हणजे त्यांचा अनुभव जरुर वाचा, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकेल.
स्मार्टफोन नीट तपासून पाहा : ई कॉमर्स वेबसाईटवर दमदार ऑफर्स असतात. यापैकी अनेक स्मार्टफोन असे असतात, जे जुने असतात, तरीही पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे तुमच्याकडे आलेला फोन नवा आहे की जुना हे तपासून पाहा.
वॉरंटी : प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी वॉरंटीवर न विसरता लक्ष द्या, अन्यथा तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो.
सर्वोत्तम ऑफर निवडा : एकाच प्रोडक्टवर अनेक ऑफर असतात, पण घाईमध्ये बऱ्याचदा याचा विसर पडतो. त्यामुळे नेहमी ऑफर पाहा आणि मगच खरेदी करा.
डिलीव्हरी टाईम नीट निवडा : तुम्ही प्रोडक्टची डिलीव्हरी निवडत असता, तेव्हा वेळ आणि टाईम व्यवस्थित निवडा. शिवाय तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं स्टेटस ट्रॅक करण्याचीही सुविधा असते. डिलीव्हरी घेण्यासाठी तुम्ही वेळेवर उपस्थित नसल्यास नंतर अडचण येऊ शकते.
ऑफिशिअल वेबसाईटवरुन खात्री : कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी संबंधित फोनच्या कंपनीची वेबसाईट एकदा नक्की पाहा. अनेकदा प्रोडक्टची माहिती चुकीची असते, ज्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो.
रिफंड-रिटर्न पॉलिसी : स्मार्टफोन खरेदी करताना रिफंड आणि रिटर्न पॉलिसीवर लक्ष देणं सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, खराब वस्तू आल्यास तुम्हाला याच पॉलिसीचा फायदा होणार आहे, अन्यथा पैसे व्यर्थ जाऊ शकतात.
एक्स्चेंज ऑफर : स्मार्टफोन खरेदी करताना अनेकदा जुना स्मार्टफोन देऊन नवा घेण्याची ऑफर असते. त्यामुळे एक्स्चेंज ऑफरवर नक्की लक्ष द्या, जेणेकरुन तुम्हाला या ऑफरचा फायदा होईल.
रिव्ह्यू आणि आफ्टर सेल सर्व्हिस : ग्राहकांनी हा फोन खरेदी केल्यानंतर कसा रिव्ह्यू दिला आहे, ते नक्की पाहा. शिवाय तुम्ही ज्या कंपनीचा फोन घेताय, त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे, ते पाहणंही विसरु नका.
ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताना या 10 गोष्टींची काळजी घ्या...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 01:15 PM (IST)
ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताना बऱ्याचदा गोंधळ उडतो, ज्यामुळे कधी चांगली ऑफर मिस होते, तर कधी आर्थिक तोटाही होतो. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -