मुंबई : दक्षिण कोरीयातील सॅमसंग कंपनीने गेल्या तीन महिन्यात स्मार्टफोन विक्रीचा नवा विक्रम केला आहे. तीन महिन्याच्या अकडेवारीवरून सॅमसंगच्या या वर्षभरात 32 कोटी स्मार्टफोन विक्रीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील एका कंपनीने केलल्या सर्वेक्षणानुसार सॅमसंगने गेल्या तीन महिन्यात 8.15 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. तर दुसरीकडे याच कालावधीमध्ये अॅपलने 5.16 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये 12 चीनी कंपन्याचाही समावेश आहे.
या 12 कंपन्यांच्या यादीत मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीचाही समावेश आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यात 50 लाख स्मार्टफोनची विक्री केली. या आकडेवारीवरून वर्षभरात कंपनी 2.5 कोटी स्मार्टफोन विक्रीचा अंदाज बांधला जात आहे.
अॅन्ड्राइड डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, चीनी कंपनी हुवाइ तिसऱ्या स्थानी, ओप्पो चौथ्या, शिओमी पाचव्या, विवो सहाव्या, झेडटीइ आठव्या, लिनोवो नवव्या, टिसीएल दहाव्या आणि मेजू अकराव्या स्थानी आहे.
सोनी, मायक्रोसॉफ्ट आणि कुलपॅडसारख्या कंपनी या टॉप 12 यादीतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. आयसी इनसाइटनुसार जगभरात स्मार्टफोनच्या विक्रीत पाच पटीने वाढ झाली आहे. चालू वर्षी 1.5 अरब स्मार्टफोनच्या विक्रीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.