आज जर फेसबुक सुरु केलं असतं तर असं नसतं : झुकरबर्ग
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 03:40 PM (IST)
मुंबई : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांने पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह फिचरचा वापर करून फेसबुक यूजर्सच्या प्रश्नांना लाईव्ह उत्तरं दिली. यावेळी त्यांनी व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफीशअल इंटिलिजन्स, फेसबुकमध्ये भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा आदींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी भविष्यातही फेसबुक पूर्णपणे मोफतच असेल हे स्पष्ट केलं. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता एक तास हा कार्यक्रम झाला. एका यूजरने आज फेसबुक सुरु केले असते तर त्याचे काय स्वरुप असते असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना त्याने सांगितले की, जर मला जंगलातही नेऊन सोडले तरी माझे लोकांना जोडण्याचे काम चालूच असतं, असे उत्तर दिले.