नवी दिल्ली : सॅमसंगने शुक्रवारी आपल्या ‘मेक फॉर इंडिया’ सेलिब्रेशनची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत भारतात सॅमसंग कंपनी आपल्या अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट देणार आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घेता येणार आहे.
याचसोबत सॅमसंग कंपनीने ‘नो एक्स्ट्रा कॉस्ट’ नावाची योजनाही सुरु केली आहे. यामध्ये ग्राहक 1 रुपयात डिव्हाईस मिळवू शकतात आणि 10 ईएमआय ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत.
‘मेक फॉर इंडिया’ सेलिब्रेशनअंतर्गत गॅलेक्सी S6 ची किंमत 33 हजार 900 रुपये आहे आणि नोट 5 ची किंमत 42 हजार 900 रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक ऑफरही मिळणार आहे. त्याचसोबत हे स्मार्टफोन्स तुम्ही 3, 6, 9 आणि 12 महिन्यांच्या ईएमआयवरही खरेदी करु शकता.
या ऑफरमध्ये गॅलेक्सी A7 (2016) हा स्मार्टफोन 29 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. गॅलेक्सी A5 (2016) स्मार्टफोनची किंमत 24 हजार 900 रुपये आहे. तर गॅलेक्सी ग्रँड प्राईम 4G स्मार्टफोन 8 हजार 250 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
सॅमसंग कंपनीने ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर स्मार्ट टीव्ही, स्प्लिट एसी आणि गॅलेक्सी टॅब्लेटवरही आहे.