मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जाणाऱ्या व्हॉटसअॅपने नुकतंच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे फिचर अपडेट केलं आहे. आता व्हॉटसअॅप काही आठवड्यातच नवीन आणि महत्त्वाचे फिचर्स घेऊन येणार आहे.
व्हॉटसअॅपच्या नव्या फिचर्समध्ये 'कॉल बॅक' हे फिचर अपडेट होईल. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी असेल.
"कॉल बॅक" फिचरमुळे युझर्सना केवळ एका बटण/टॅबद्वारे, अॅप न उघडता 'कॉल बॅक' करता येणार आहे.
युझर्सना हे बटण नोटिफिकेशन बारवरच उपलब्ध होईल. ज्यामुळे अॅप न उघडता तुम्हाला कॉलबॅक करता येऊ शकेल.
दुसरीकडे व्हॉट्सअप iOS युझर्ससाठी व्हॉइस मेलचा पर्यायही उपलब्ध करुन देणार आहे.
या फिचरमध्ये व्हॉट्सअपच्या मदतीने युझर्स व्हॉईस मेल रेकॉर्ड करुन तो सेंड करु शकतील. इतकंच नाही तर नव्या फिचर्समुळे PDF आणि Zip फाईल्सही पाठवता येणं शक्य होणार आहे.
जरं हे शक्य झालं तर मोठ्या आणि जास्त आकाराच्या फाईल्सही सहज शेअर करु शकाल.
कंपनीचं हे फिचर सध्या बिटा व्हर्जनमध्ये तपासलं जात आहे. काही आठवड्यातच हे फिचर तुमच्या भेटीला येईल.