सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट 7’ने बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले!
Advertisement
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 05:08 AM (IST)
मुंबई : गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. कोरियन हेरॉल्डच्या वृत्तानुसार, दोन दिवसात तब्बल 2 लाख ग्राहकांनी स्मार्टफोनसाठी पूर्वनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे ही संख्या स्मार्टफोन ‘गॅलेक्सी S7’च्या पूर्वनोंदणीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनची ग्राहकांमधील उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे. सॅमसंगने गॅलेक्सी फ्लॅगशिप निवडक देशांमध्येच लॉन्च केले आहेत. भारतात गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन 11 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. ‘गॅलेक्सी नोट 7’चे फीचर्स :
7 डिस्प्ले (1440×2560 पिक्सेल)
स्नॅपड्रॅगन 820 चिप क्वालकॉम प्रोसेसर
4 जीबी रॅम
64 जीबी इंटरनल स्टोरेज
256 जीबीपर्यंत स्टोरेज एक्स्पांडेबल
12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (f/1.7 लेन्स)
5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
आयरिस स्कॅनर (डोळ्यांनी फोन अनलॉक करण्याची सुविधा)