मुंबई : सॅमसंग कंपनीने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 'सॅमसंग गॅलेक्सी सी-7 प्रो' असे या स्मार्टफोनचं नाव असून, हँडेसट चिनी वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या नव्या हँडसेटची झलक गॅलेक्सी सी-5 प्रो आणि गॅलेक्सी सी-9 प्रो या दोन स्मार्टफोनमधून दाखवण्यात आली होती. गॅलेक्सी सी-7 प्रो स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये बेन्चमार्क साईट अंतूतूवरही लिस्ट केला होता.

गॅलेक्सी सी-7 प्रो हँडसेट अँड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालणारा असून, यामध्ये 5.7 इंचाचा 1080 पिक्सेल रिझॉल्युशन असणारा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये 2.2 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 चिपसेटसोबत 4 जीबी रॅम आहे

गॅलेक्सी सी-7 प्रोमध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये F/1.9 अॅपर्चर आहे. बॅक कॅमेऱ्यातून 30 फ्रेम प्रति सेकंदाच्या वेगाने पूर्ण एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करता येणं शक्य आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी असून, मायक्रोएसडीच्या मदतीने 256 जीबी वाढवता येऊ शकतो.

172 ग्रॅम वजणाच्या या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3300 एमएएच आहे. त्याचसोबत सी-7 प्रोमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आलं आहे. पिंक, आर्कटिक ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

या स्मार्टफोनची किंमत 199 डॉलर म्हणजेच सुमारे 13 हजार 600 रुपये असण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर अजून या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही. चिनमधील स्मार्टफोन बाजारात प्री-बुकिंग सुरु झाली आहे.