मुंबई : सॅमसंगने आज (मंगळवार) गॅलक्सी S9 आणि S9 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 57,900 रुपयांपासून सुरु होते. सॅमसंगने लाँचिंगआधी आपल्या अधिकृत वेबसाईटवर दोन्ही स्मार्टफोनची ऑनलाईन बुकींग सुरु केली होती.


सॅमसंगने S9 आणि S9 प्लसचे दोन-दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत.

गॅलक्सी S9 (64 जीबी) - किंमत 57,900 रुपये

गॅलक्सी S9 (256 जीबी) - किंमत 65,900 रुपये

गॅलक्सी S9 प्लस (64 जीबी) - किंमत 64,900 रुपये

गॅलक्सी S9 प्लस (256 जीबी) - किंमत 72,900 रुपये

सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन 16 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी S9 आणि S9 प्लसचे फीचर्स :

सॅमसंगने गॅलक्सी S9 आणि S9 प्लसमध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. गॅलक्सी S9 मध्ये 5.8 इंच स्क्रीन देण्यात आली असून S9 प्लसमध्ये 6.2 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनचं रेझ्युलेशन 2960 x 1440 पिक्सल आहे. तसंच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. गॅलक्सी S9 मध्ये 4 जीबी रॅम आणि S9 प्लसमध्ये 6 जीबी रॅम देण्यात आली आहे.

गॅलक्सी S9 मध्ये रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल देण्यात आला आहे. तर गॅलक्सी S9 प्लसमध्ये ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे.

VIDEO :