मुंबई : रेनॉल्टची डस्टर कार घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेनॉल्टने डस्टर एसयूव्ही कारच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. या कारची किंमत तब्बल 1 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नव्या किंमती 1 मार्च 2018 पासून लागू करण्यात आल्या आहेत.
पाहा रेनॉल्ट डस्टरच्या जुन्या आणि नव्या किंमती :
मॉडेलजुनी किंमतनवी किंमत किंमतीतील अंतर
आरएक्सई8.50 लाख रुपये7.95 लाख रुपये55,925 रुपये
आरएक्सएल9.30 लाख रुपये8.79 लाख रुपये51,816 रुपये
आरएक्सएस सीव्हीटी पेट्रोल10.24 लाख रुपये9.95 लाख रुपये29,746 रुपये
एसटीडी 85 पीएस पेट्रोल10.24 लाख रुपये8.95 लाख रुपये50,663 रुपये
आरएक्सई 85 पीएस डिझेल9.65 लाख रुपये9.09 लाख रुपये56,560 रुपये
आरएक्सएस 85 पीएस डिझेल10.74 लाख रुपये9.95 लाख रुपये79,034 रुपये
आरएक्सजेड 85 पीएस डिझेल11.65 लाख रुपये10.89 लाख रुपये76,237 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस डिझेल12.49 लाख रुपये11.79 लाख रुपये70,976 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस एएमटी डिझेल13.09 लाख रुपये12.33 लाख रुपये76,970 रुपये
आरएक्सजेड 110 पीएस एडब्ल्यूडी डिझेल13.79 लाख रुपये12.79 लाख रुपये1 लाख रुपये
वर दिलेल्या आकड्यांनुसार आरएक्सएस सीव्हीटी पेट्रोलची किंमत सर्वात कमी आणि आरएक्सझेड 110 पीएस एडब्ल्यूडी डिझेलच्या किंमतीत सर्वात जास्त कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर डस्टरचा टॉप मॉडेल हा ह्युंदाई क्रेटापेक्षा 2.73 लाखांनी स्वस्त झाला आहे. कंपनीने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे डस्टरच्या विक्रीत वाढ होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. बातमी सौजन्य : cardekho.com