नवी दिल्ली : सॅमसंगच्या गॅलक्सी 'एस 7' च्या घवघवीत यशानंतर आता 'एस 8' हा हायटेक फीचर्सचा फोन बाजारात येणार आहे. मात्र या फोनच्या फीचर्सविषयी आतापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. फेब्रुवारीत बार्सीलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फ्रन्समध्ये सॅमसंगकडून या फोनबाबत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या 'सीरी' या व्हॉईस असिस्टेंटप्रमाणे 'एस 8' मध्येही खास फीचर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 'एस 8' मध्ये 6 GB रॅम, 256 GB स्टोरेज? 'एस 8' मध्ये 6 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तर यामध्ये ऑप्टीकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि हायटेक फीचर्सचा कॅमेरा असेल. यामध्ये ड्युअल स्क्रीन असू शकते. एका स्क्रीनची साईज 5.7 इंच तर दुसऱ्या स्क्रीनची साईज 6.2 इंच असेल. शिवाय 'एस 7' पेक्षा जास्त दमदार फीचर्स यामध्ये देण्यात येणार आहेत. यापूर्वी सॅमसंगने एस 7 आणि एस 7 एज हे फोन लाँच केले होते. या महागड्या किंमतीच्या फोनला ग्राहकांनी चांगली पसंती दिल्याचं चित्र आहे. सॅमसंग गॅलक्सी S7 चे फीचर्स :
  • 5.1 इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन
  • ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार
  • क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी
  • 1.6GHz Exynos 8890 ऑक्टाकोअर प्रोसेसर
  • 4GB रॅम
  • 12 मेगापिक्सेल रेअर, 5 मेगापिक्सेलचा सेल्फी (फ्रंट) कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश
  • 32GB मेमरी (मायक्रो SD कार्ड स्लॉट)
  • पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन (IP68 सर्टिफिकेट)
  • 3000mAh बॅटरी
  • वायरलेस चार्जिंग
  सॅमसंग गॅलक्सी S7 Edge चे फीचर्स :
  • 5.5 इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन
  • ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार
  • क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी
  • 1.6GHz Exynos 8890 ऑक्टाकोअर प्रोसेसर
  • 4GB रॅम
  • 12 मेगापिक्सेल रेअर, 5 मेगापिक्सेलचा सेल्फी (फ्रंट) कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश
  • 32GB मेमरी (मायक्रो SD कार्ड स्लॉट)
  • पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन (IP68 सर्टिफिकेट)
  • 3600mAh बॅटरी
  • वायरलेस चार्जिंग