मुंबई : वन प्लस या प्रसिद्ध चिनी कंपनीचा नवीन स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी दाखल होणार आहे. 'वन प्लस 3T' या स्मार्टफोनची अनेकांना उत्सुकता होती. अखेर या स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला आहे.
येत्या 2 डिसेंबरला वन प्लस 3T स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल, अशी माहिती वन प्लस कंपनीचे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी ट्विटरवरुन एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
वन प्लस 3T या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही माहिती उघड केली नाही. दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन असेल. शिवाय, डिझाईन 'वन प्लस 3' स्मार्टफोनसारखीच असेल. मात्र, नव्या स्मार्टफोनमध्ये उत्तम प्रोसेसर आणि कॅमेरा फीचर्स असलेला आहे. वन प्लस 3T मध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश आणि फिगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.
एकदा चार्जिंग केल्यानंतर अधिकाधिक वेळ फोन वापरता यावा, यासाठी या स्मार्टफोनमध्ये 3,400 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनला डिसेंबर अखेरपर्यंत अँड्रॉईड 7.0 नॉगट अपडेट मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ :
https://twitter.com/OnePlus_IN/status/801774039127785472