Samsung Galaxy S23 Series : जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागेल. कारण कोरियन कंपनी Samsung पुढील महिन्यात Galaxy s23 सीरिज लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 1 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. Samsung Galaxy S23 सीरिजमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे आणि स्मार्टफोनची किंमत किती असेल याबद्दल जाणून घ्या.
3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील
Samsung S23 सीरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन बाजारात लॉन्च करू शकते. यामध्ये पहिला Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy s23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy s23 Ultra आहे. Samsung Galaxy s23 आणि s23 plus मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसू शकतो ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स असू शकतात. तर Samsung Galaxy s23 Ultra मध्ये 200-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा दिसू शकतो.
बॅटरी
मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy s23 मध्ये 3900 mAh बॅटरी, S23 Plus मध्ये 4700 mAh बॅटरी आणि s23 अल्ट्रा मध्ये 5000 mAh बॅटरी पाहिली जाऊ शकते. या मालिकेतील पहिले दोन स्मार्टफोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील तर Samsung Galaxy S23 Ultra 45W च्या जवळ चार्जिंगला सपोर्ट करेल. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात Qualcomm Snapdragon 8 Generation 2 चिपसेट पाहायला मिळेल.
स्क्रीन
Samsung Galaxy S23 मध्ये 6.4-इंचाचा FHD Plus डिस्प्ले दिसेल जो 120 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Galaxy S23 Plus मध्ये 6.6-इंच स्क्रीन आणि S23 Ultra मध्ये मोठा 6.8-इंचाचा डिस्प्ले दिसेल. या सर्व उपकरणांवर तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन टू चिपसेट मिळेल. यात 16GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज असेल.
किंमत किती असेल?
सॅमसंगने अधिकृतपणे किंमत जाहीर केलेली नाही परंतु इंटरनेटवर समोर आलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy S23 ची किंमत 80,000 रुपये असू शकते. S23 Plus ची किंमत 90,000 रुपये असू शकते. तर, s23 अल्ट्राची किंमत 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. 1 फेब्रुवारी हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल आणि त्यानंतर काही दिवसांनी तो भारतात लॉन्च होईल.
महत्त्वाच्या बातम्या :