मुंबई : सॅमसंग आणखी एक फ्लॅगशिप फॅबलेट लाँच करण्यासाठी सज्ज आहे. 'ब्लूमबर्ग'च्या रिपोर्टनुसार, कंपनी गॅलक्सी नोट 9 हा फोन 9 ऑगस्ट 2018 रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. फोनमध्ये अपग्रेडेड कॅमेराला हायलाईट करण्यात आलं आहे.

हा नवा फोन मागच्या वर्षीच्या फोनसारखाच असेल, असंही बोललं जात आहे. यामध्ये अपग्रेडेड क्वालकॉम प्रोसेसर असेल. तर गॅलक्सी एस 9 आणि गॅलक्सी एस 9 प्लस पहिले असे फोन आहेत, ज्यामध्ये लाँचिंगच्या वेळीच स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलं होतं.

सॅमसंगच्या या लाँचिंग इव्हेंटचं आयोजन न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. या फोनसोबतच सॅमसंग लाईट व्हर्जनवरही काम करत आहे, जे सॅमसंग एस 9 मिनी नावाने ओळखलं जाईल. फोनचे काही फोटो नुकतेच दिसून आले होते, ज्यामध्ये बॅक आणि फ्रंट साईड दिसत होती.

फीचर्स काय असतील?

या फोनमध्ये 5.8 इंच आकाराचा QHD+ डिस्प्ले आहे, ज्याचं रिझोल्युशन 1440 x 2960 पिक्सेल आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर सॅमसंग जॉनस 9 सीरिज 9810 प्रोसेसर देण्यात आलं आहे, जे G72MMP18 जीपीयू सोबत असेल.

युझर्सना 400 GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन मिळणार आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर 8 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सेंसरचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.