वॉशिंग्टन (अमेरिका): सॅमसंग गॅलक्सी नोट 7 हा स्मार्टफोन बाजारातून अधिकृतपणे हद्दपार करण्याची घोषणा अमेरिका सरकारने केली आहे. या फोनच्या बॅटरीमध्ये स्फोटाच्या अनेक घटना समोर आल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना खरेदी केलेले फोन परत करण्याचे निर्देश दिले आहेत.


अमेरिकेत नोट 7 चे विकण्यात आलेले 10 हजार फोनही परत मागविण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ग्राहक उत्पादन संरक्षण आयुक्तांनी एका सूचनेद्वारे दिली आहे. 15 सप्टेंबरपूर्वी खेरदी केलेल्या नोट 7 फोनचा वापर त्वरित बंद करण्याचे निर्देश ग्राहकांनाही देण्यात आले आहेत.

अमेरिकेत बॅटरी स्फोटाच्या 92 घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमुळे कार आणि गॅरेजमध्ये जळाल्याच्याही घटना घडल्या आहेत. ग्राहकांनी फोन परत करण्यासाठी सॅमसंग स्टोअर्स, वेबसाईट किंवा इतर कनेक्टिव्हीटीचा आधार घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.