नॅथनच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन त्याने जीपमध्ये चार्जिंगला लावला होता. मात्र त्याचवेळी फोनचा स्फोट झाला. या घटनेत गाडीलाही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावं लागलं. या घटनेत फोन आणि गाडीच्या आतील भागाची अक्षरश: राख झाली.
जगभरातून 25 लाख सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 कंपनीने परत मागवले
चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट होत असल्यामुळे गॅलेक्सी नोट 7 परत मागवत असल्याचं कंपनीने सांगितल्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली.
नॅथनही या घटनेची माहिती, तसंच फोन आणि गाडीचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.