चेन्नई : जीएसएलव्ही एफ-05 क्षेपणास्त्र आज 4 वाजून 10 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे. काल सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी या क्षेपणास्त्रासाठी 29 तासांचं काऊंटडाऊन सुरु झालं होतं. काऊंटडाऊन सुरळीत सुरु असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.


 

जीएसएलव्ही एफ-05 च्या साहाय्याने भारताचा हवामानावर लक्ष ठेवणारा उपग्रह इन्सॅट-3डीआर प्रक्षेपित केला जाईल. आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे.

 

2,211 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण 28 ऑगस्ट रोजी होणार होतं, पण तांत्रिक दोषांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं. 26 जूलै 2013 रोजी अवकाशात सोडलेल्या इन्सॅट 3डी उपग्रहासोबतच इन्सॅट-3डीआर काम करेल.