मुंबई : सॅमसंगनं आपल्या J सीरीजमधील गॅलक्सी J7 मॅक्स आणि गॅलक्सी J7 प्रो हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आले आहेत. या स्मार्टफोनसाठी सॅमसंगनं जिओच्या साथीनं एक खास ऑफरही आणली आहे. जिओ नेटवर्कवर गॅलक्सी J7 मॅक्स आणि J7 प्रो खरेदीवर 120 जीबीचा डेटा मिळणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी J7 मॅक्सची किंमत 17,900 रुपये आहे तर J7 प्रोची किंमत 20,900 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन रिटेलर आणि ऑनलाइनही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
J7 मॅक्स हा स्मार्टफोन 20 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल तर J7 प्रो जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
फीचर्स :
सॅमसंग गॅलक्सी J7 मॅक्समध्ये नॉगट 7.0 ओएस आहे. तसेच यामध्ये 5.7 डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये मीडियाटेक हेलिया P20 ऑक्टाकोअर प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच 32 जीबी इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे. एसडी कार्डनं याची मेमरी वाढवता येणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3300 mAh बॅटरीही आहे. वाय-फाय, ब्ल्यूटूथ, आणि जीपीएस सारखे ऑप्शनही देण्यात आले आहेत.
गॅलक्सी J7 प्रोमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये Exynos 7870 ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 3 जीबी रॅम आहे. तर 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. एसडी कार्डनं 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 3600 mAh बॅटरी आहे.