नवी दिल्ली : मोटोचा आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहे. 19 जूनला मोटो C प्लस हा स्मार्टफोन भारतात लाँच होईल, अशी माहिती मोटोने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मोटो C प्लस हा स्मार्टफोन 8 हजार रुपयांमध्ये जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही या फोनची किंमत 8 हजार रुपयांच्या आसपास असेल, असा अंदाज लावला जात आहे. मोटो C प्लसचे फीचर्स :
  • 7.0 नॉगट सिस्टम
  • 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
  • 1.3 गीगाहर्ट्स क्वाड कोअर प्रोसेसर
  • 2GB रॅम
  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 4000mAh क्षमतेची बॅटरी