मुंबई : LGनं आपल्या G6 या स्मार्टफोनवर आतापर्यंतचं सर्वाधिक डिस्काउंट दिलं आहे. अमेझॉन इंडियावर प्राईम यूजर्सला 13,000 रुपयांपर्यंतचं बंपर सूट मिळणार आहे. त्यामुळे ही ऑफर मिळविण्यासाठी अमेझॉनचं प्राईम मेंबर असणं गरजेचं आहे.
या ऑफरमुळे LG G6 हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीला उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीनं नो कॉस्ट ईएमआय ऑफरही दिली आहे. भरघोस सूट दिल्यामुळे आता हा स्मार्टफोन 38,990 रुपयांमध्ये मिळणार आहे. लाँचिंगवेळी याची किंमत 51,990 रुपये होती.
LG G6 स्मार्टफोनचे खास फीचर्स :
- 18:9 फूल व्हिजन डिस्प्ले, डॉल्बी व्हिजन सपोर्टिव्ह स्मार्टफोन
- 5.7 इंच QHD+ स्क्रीन, रेझ्युलेशन 2800x1400 पिक्सल
- अँड्रॉईड नॉगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टम
- 2.35GHz क्वॉड कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी
- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- बॅटरी 3,300 mAh