नवी दिल्लीः 'सॅमसंग डेज' या खास ऑफरनुसार फ्लिपकार्टवर सॅमसंग J5 या बजेट स्मार्टफोनवर 1300 रुपयांची सूट चालू आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत या फोनवर 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळवता येणार आहे.   एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी फ्लिपकार्टवर जुन्या फोनची माहिती नोंदवायची आहे. जुन्या फोनची माहिती दिल्यानंतर फोनची कमाल किंमत दाखवली जाईल. J5 ची मूळ किंमत 13 हजार 990 रुपये आहे.   J5 चे फीचर्सः  
  • 5.2 इंच आकाराची स्क्रिन
  • 1.2GHz क्वाडकोअर प्रोसेसर
  • 2 जीबी रॅम, 16 जीबी स्टोरेज
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3100mAh क्षमतेची बॅटरी