मुंबई : चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या सर्वात महागडा आणि प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. शाओमी Mi5 स्मार्टफोन 2 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.   किंमतीतील कपातीनंतर 22 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनू जैन यांनी ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.   शाओमी Mi5 स्मार्टफोनच्या किंमतीतल्या कपातीनंतर नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com वरुन खरेदी करता येणार आहे.   शाओमी Mi 5 चे काही महत्त्वाचे फीचर्स :  
  • 15 इंच एचडी स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 4 अल्ट्रामेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
  • 4k व्हिडीओ शूट करण्याची सुविधा