Made in India iPhone: जगातील प्रत्येक दुसरा आयफोन 2027 पर्यंत भारतात तयार केला जाऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर आता 5 टक्क्यांहून कमी आयफोन भारतात बनतात. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान Apple ने भारतातून 2.5 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्यात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने (Make in India Campaign)  हे विश्लेषण केले आहे. जेपी मॉर्गन यांनी यापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की, 2025 पर्यंत भारत जगातील 25 टक्के आयफोन बनवले जाऊ शकतात. 


Made in India iPhone: नवीन आयफोन मॉडेल्सचे अॅसेम्ब‌ल करण्यास सुरुवात 


अमेरिकेतील दिग्गज कंपनी Apple ने गेल्या वर्षी भारतात नवीन आयफोन मॉडेल्स अॅसेम्ब‌ल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी नवीन iPhones चे अॅसेम्ब‌ल  चीनमध्ये विद्यमान फॉक्सकॉनसह इतर पुरवठादारांनी केले आहे. मात्र भारतातील प्रचंड मोठा कर्मचारी वर्ग, मोदी सरकारचा धोरणात्मक पाठिंबा आणि तेजीत असलेली स्थानिक बाजारपेठ यामुळे आपला देश हा आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी प्रमुख उमेदवार बनला आहे. 


Made in India iPhone: अॅपलचे पुरवठादार पीएलआय योजनेचा लाभ घेत आहेत


अॅपलचा सर्वात मोठा पुरवठादार फॉक्सकॉनने पाच वर्षांपूर्वी देशात सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली. नवीन सरकारच्या सवलतींमुळे याला झपाट्याने गती मिळाली आहे. पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया धोरणाचा हा एक भाग आहे, ज्यामुळे त्यांना देशाला उत्पादन केंद्र बनवायचे आहे. PLI योजनेच्या पहिल्या वर्षात फॉक्सकॉनला 3.6 अब्ज रुपयांचा नफा झाला. उद्योग विश्लेषकांच्या मते, भारतात आयफोनच्या निर्मितीमध्ये मोठी वाढ होणार आहे. Apple चे तीन कंत्राटी उत्पादक Foxconn, Pegatron आणि Wistron सरकारच्या 41,000 कोटी PLI योजनेचा लाभ घेऊन त्यांचे उत्पादन वाढवत आहेत.


दरम्यान, गेल्या महिन्या  अॅपल विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, फॉक्सकॉन आपल्या भारतातील प्लांटची क्षमता वाढवेल. परिणामी 2023 मध्ये भारतात फॉक्सकॉनद्वारे निर्मित आयफोनच्या संख्येत किमान 150 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. मध्यम किंवा दीर्घकालीन लक्ष्य भारतातून 40-50% आयफोन शिपमेंटसाठी आहे. सध्या Apple भारतात iPhone SE, iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 (बेसिक) बनवते.