मुंबई : सॅमसंग गॅलक्सी सी 7 प्रोच्या किंमतीत भारतात 2500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा फोन 27 हजार 990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर याची किंमत 24 हजार 990 रुपये करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा किंमतीत कपात केल्याने हा फोन आता 22 हजार 400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.


अमेझॉनवर हा फोन नव्या किंमतीसह उपलब्ध आहे. दहा हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन तुम्ही खरेदी करु शकता. क्रेडिट कार्डवर फोन खरेदी केल्यास एक हजार 41 रुपयांपासून या फोनचा ईएमआय सुरु होईल.

सॅमसंग गॅलेक्सी C7 Pro चे फीचर्स :

ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉईड 6.0.1 मार्शमेलो

रॅम : 4 जीबी

मेमरी : 32 जीबी आणि 16 जीबी

प्रोसेसर : 2.2 GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर/अँड्रेनो 506 जीपीयू

डिस्प्ले : 5.7 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले

बॅटरी : 3300 mAh

कॅमेरा : 16 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअर