मुंबई : सॅमसंगने ‘गॅलेक्सी A6’ हा स्मार्टफोन एक महिन्यापूर्वीच लॉन्च केला होता. याच स्मार्टफोनच्या 32 GB व्हेरिएंटच्या किमतीत सॅमसंगने आता मोठी कपात केली आहे. सॅमसंगने ‘गॅलेक्सी A6’ची किंमत दोन हजार रूपयांनी कमी केली आहे.


अगोदर 21,990 रूपये किंमत असणारा हा फोन आता 19,990 रूपयांना ग्राहकांना उपलब्ध असेल.

‘गॅलेक्सी A6’ अमेझॉनवरही कमी किमतीसह उपलब्ध झाल्याने, ग्राहकांना हा फोन ऑनलाईनही खरेदी करता येईल.

गॅलेक्सी A6’ चे फीचर्स  

‘गॅलेक्सी A6’ हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्राईड ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनची स्क्रीन 5.6 इंच एवढी आहे. प्रोसेसरचा विचार करता यामध्ये 1.6GHz ऑक्टा-कोर Exynos 7 प्रोसेसर दिला गेला आहे . तर 4 GB रॅंम देण्यात आली आहे. तसंच या स्मार्टफोनला 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा LED फ्लॅशसह उपलब्ध आहेत.

दरम्यान, ‘गॅलेक्सी A6’चा 32 GB व्हेरिएंट उपलब्ध आहे. पण 64 GB व्हेरिएंट अजून बाजारात उपलब्ध नाही.