मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने दुसऱ्या तिमाहीमध्ये तब्बल 45.6 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. सॅमसंगने 7.24 बिलिअन डॉलरचा नफाही मिळवला आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिमाहीची अर्थातच 1 एप्रील ते 30 जून 2016 दरम्यानची आहे.
सॅमसंगने या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सलग एवढा नफा कमावला आहे. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी S7 आणि सॅमसंग गॅलॅक्सी S7 एज स्मार्टफोनच्या कमाईतून सॅमसंगने हा नफा कमावल्याचं समोर आलं आहे.
ओएलईडी डिस्प्लेच्या मागणीत वाढ
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मोबाईल कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या अहवालानुसार मोबाईल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ओएलईडी डिस्प्ले पॅनल्स आणि मोबाईल सेमीकंडक्टर्सच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याचा फायदा सॅमसंगच्या मोबाईलना झाला आहे.
सॅमसंगचा गॅलॅक्सी नोट 7 लवकरच बाजारात
सॅमसंगला पुढील वर्षभरात परिस्थीती अनुकुल राहील अशी आशा आहे. तसेच आपल्या नफ्याच्या वाढीसाठी सॅमसंग प्रयत्नशील राहणार आहे. सॅमसंग आपला गॅलॅक्सी नोट 7 बाजारात आणणार असून त्यामुळेही सॅमसंगचा नफा वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.