मुंबई : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी पॅनासॉनिकने T44 Lite हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. भारतीय बाजारपेठ विचारात घेऊन हा स्मार्टफोन लॉन्च केल्याचं कंपनीने सांगितलं आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 3199 रुपये आहे.


 


पॅनासॉनिकचा T44 Lite स्मार्टफोन 1 ऑगस्टपासून स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन रोज गोल्ड, शँपेन गोल्ड आणि इलेक्ट्रिक ब्लू या तीन आकर्षक रंगात उपलब्ध असेल.


 


या फोनमध्ये 4 इंच डिस्प्लेसोबत 1.3 गीगाहर्त्झ क्वॉडकोअर प्रोसेसर असेल. 512 MB रॅम, 8 GB इंटरनल मेमरीसह हा फोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 वर काम करेल. 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरासोबत फ्रंट व्हीजीए कॅमेराही या फोनमध्ये देण्यात आला आहे. 2400mAh क्षमतेची बॅटरी असलेला हा फोन 3G एनेबल्ड असेल.


 


T44 Lite स्पार्टफोनचे फीचर्स


- अँडॉईड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम


- तीन आकर्षक रंगात उपलब्ध


- ड्यूएल सिम


- 2400 mAh बॅटरी बॅकअप


- 1.3 गीगाहर्त्झ क्वॉडकोअर प्रोसेसर


- स्नॅपडीलवर उपलब्ध