सॅमसंग कंपनीने आपला ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता. ड्युअल कॅमेरा सेटअपचा सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन होता. या स्मार्टफोनच्या प्रमोशनवरुन सध्या सॅमसंग कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रमोशनसाठीचे फोटो इंटरनली क्लिक करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण फोटोबाबत वाद सुरु झाल्यानंतर सॅमसंग ब्राझिलने दिले. तसेच, ‘गॅलेक्सी ए-8’ स्मार्टफोनमधून प्रमोशनसाठी जे फोटो वापरण्यात आले होते, तेवढ्या क्वालिटीचे फोटो काढले जाऊ शकत नाहीत, अशी कबुलीही सॅमसंग ब्राझिलने दिली आहे.
ट्विटरवर एका युझरने गेट्टी इमेज आणि सॅमसंग ब्राझिलने प्रमोशनासाठी वापरलेला फोटो ट्वीट करत सॅमसंग ब्राझिलला टॅग केले आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर सॅमसंग कंपनीला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागते आहे.
‘गॅलेक्सी ए-8’चे फीचर्स काय आहेत?
- ड्युअल कॅमेरा सेटअप (16 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेल)
- कॅमेऱ्याच्या दोन्ही सेन्सरमध्ये लाईव्ह फोकस फीचर, सेल्फ पोट्रेटची सुविधा
- बॅक कॅमेरा 16 मेगापिक्सेल
- 5.6 इंचाचा पूर्णपणे एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले
- ऑक्टा कोर Soc प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 64 जीबी स्टोरेज
अँड्रॉईड अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, सॅमसंग ही केवळ एकच कंपनी नाही, जी युझर्सना स्टॉक इमेजेसमधील फोटोंचा वापर करुन फसवते. अशा अनेक कंपन्या आहेत. 2016 साली हुवाई या मोबाईल कंपनीवरही असाच कॅमेरा प्रमोशनसाठी वापरण्यात आलेल्या फोटोवरुन आरोप करण्यात आला होता.