मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावानं भारतात उद्या म्हणजेच 3 मेला नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. ‘स्मार्टोन’  या कंपनीनं हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

सचिन रमेश तेंडुलकर अर्थात 'एसआरटी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे. 4 जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. शिवाय फोनच्या मागे तेंडुलकरची स्वाक्षरीही असणार आहे.

आपल्या नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची माहिती खुद्द सचिनने दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली.


स्मार्टोन SRT स्मार्टफोनमध्ये कोणतकोणते फीचर?:

या स्मार्टफोनमध्ये नेमके कोणते फीचर असणार याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पण काही रिपोर्टनुसार यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले, ग्लोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन असू शकतं. तसंच यात ड्यूल सिम सपोर्ट, अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो, प्रोसेसर ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे.

यासोबतच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.