मुंबई: सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन S8 काही दिवसांपूर्वीच लाँच केला. पण या नव्या स्मार्टफोनबाबत सध्या एक नवी तक्रार समोर येत आहे. S8 हा स्मार्टफोन बऱ्याचदा रिस्टार्ट होत असल्याची तक्रार यूजर्सकडून केली जात आहे.

अमेरिकेतील यूजर्सने स्मार्टफोन रिस्टार्ट होत असल्याची तक्रार केली आहे. याआधी या स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेमध्ये रेड टिंटची तक्रारही समोर आली आहे. त्यानंतर तक्रारीनंतर सॅमसंगनं एक अपडेट जारी केलं. त्यानंतर ही समस्या दूर झाली.

सॅमसंगच्या नोट 7ला यूजर्सनं फारशी पसंती दिली नाही. त्यानंतर सॅमसंगनं S8 आणि S8 प्लस हे दोन स्मार्टफोन मागील महिन्यात लाँच केले. दरम्यान, आता या नव्या समस्येवर सॅमसंग नेमकं काय उत्तर शोधून काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गॅलक्सी S8 चे फीचर्स :

  • 5.8 इंच एचडी स्क्रिन

  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)

  • सॅमसंग Exynos 8895 प्रोसेसर

  • 4 GB रॅम

  • 3000 mAh क्षमतेची बॅटरी


 

गॅलक्सी S8 प्लसचे फीचर्स :

  • 6.2 इंच एचडी स्क्रिन

  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)

  • 4 GB रॅम

  • 3500 mAh क्षमतेची बॅटरी


 

संबंधित बातम्या:

भारतात सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लस लाँच