मुबंई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यापासून आता इतर टेलिकॉम कंपन्याही दररोज नवनवे टेरिफ प्लॅन आणत आहेत. आता व्होडाफोननं ‘Super Hour’ हा नवा टेरिफ प्लॅन आणला आहे.
या प्लॅनमध्ये प्रीपेड यूजर्सला 7 रुपयांपासून पुढे रिचार्ज करता येणार आहे. तर पोस्टपेड यूजर्सला या प्लॅनसाठी USSD कोड डायल करावा लागेल. हा प्लॅन यूजर्स कधीही घेऊ शकतात.
या प्लॅनमध्ये यूजर्सला व्होडाफोन टू व्होडाफोन फ्री कॉल, लोकल कॉल आणि एक तासासाठी 4G/3G अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. एकपेक्षा अधिक वेळेसही हा प्लॅन वापरता येणार आहे. पण ही स्कीम अनलिमिटेड डेटा पॅक यूजर्ससाठी उपलब्ध नसेल.
जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचेही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नुकतंच व्होडाफोननं 352 रुपयांचा नवा प्लॅनही लाँच केला होता. ज्यामध्ये 84 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग दिलं होतं.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
संबंधित बातम्या :
399 रुपयात 84 GB डेटा, एअरटेलची ऑफर
ideaची नवी ऑफर, तब्बल 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
रिलायन्स जिओची नवी धन धना धन ऑफर!
जिओनंतर आता एअरटेलचीही VoLTE सेवा?