मुंबई : ह्युंदाई नवी वेरना कार 22 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. या कारची स्पर्धा होंडा सिटी, फॉक्सवॅगन वेंटो, स्कोडा रॅपिड आणि मारुती सुझुकी सियाज या कारशी असणार आहे. नव्या वेरनामध्ये पाच खास फीचर देण्यात आले आहेत.




सनरुफ

नव्या वेरना कारमध्ये इलेक्ट्रिक ऑपरेटेड सनरुफ देण्यात आलं आहे. या सेगमेंटमधील सनरुफ असणारी ही दुसरी कार आहे. याआधी होंडा सिटीमध्ये सनरुफ देण्यात आलं होतं. दरम्यान, मारुतीच्या सियाजमधील अपडेट व्हर्जनमध्ये देखील हे फीचर मिळणार असल्याची चर्चा आहे.
प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स (सेगमेंट-फर्स्ट)

रात्री ड्रायव्हिंग करताना प्रोजेक्टर लेन्सचं खूपच गरजेचं आहे. यामुळे रात्री गाडी चालवताना रस्ता स्पष्ट दिसतो. नव्या वेरना कारमध्ये फॉग लॅम्प्समध्येही प्रोजेक्टर लेन्स देण्यात आलं आहे.

हॅण्ड्स फ्री बूट (सेगमेंट-फर्स्ट)

नव्या वेरना कारमध्ये बूट लिड खोलण्यासाठी हाथ लावण्याची गर नाही. यामध्ये हॅण्डस फ्री बूट रिलीज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.



कूल्ड सीट (सेगमेंट-फर्स्ट)

या कारमध्ये पुढच्या बाजूला वेंटिलेटेड म्हणजेच हवेशीर सीट असणार आहेत. हे फीचर ह्युंदाईच्या एलांट्रा कारमध्येही देण्यात आलं आहे. अशा पद्धतीच्या सीटमुळे दूरच्या प्रवासातही अजिबात त्रास होत नाही.

इको कोटिंग (सेगमेंट-फर्स्ट)

प्रवास आरामदायी होण्यासाठी इको कोटिंग फीचर देण्यात आलं आहे. या फंक्शनमुळे गाडीत दुर्गंधी जाणवू लागल्यास ती तात्काळ शोषली जाईल. ज्यामुळे प्रवास आरामदायी होईल.

बातमी सौजन्य : cardekho.com

संबंधित बातम्या :

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं बुकिंग सुरु, 22 ऑगस्टला लाँचिंग