मुंबई : रिलायन्स कंपनीने त्यांच्या लाईफ स्मार्टफोनच्या किमती 25 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. इतकंच नाही तर दोन वर्षांच्या वॉरंटीसह जियो नेटवर्कवर तीन महिन्यांसाठी मोफत 4G डेटाही मिळणार आहे.


 
फ्लेम 2, फ्लेम 4, फ्लेम 5, फ्लेम 6, वॉटर 2 आणि विंड 6 या स्मार्टफोनवर ही सूट मिळणार आहे. फ्लेम 4, फ्लेम 5, फ्लेम 6 यांची किंमत
एक हजार रुपयांनी कमी होऊन दोन हजार 999 रुपये झाली आहे.

 
फ्लेम 2 ची किंमत 1300 रुपयांनी कमी होऊन 3 हजार 499 रुपये झाली आहे. विंड 6 आता 5 हजार 999 तर वॉटर 9 फोन 9 हजार 499 रुपयांना मिळणार आहे.

 
2 हजार 999 रुपयांचा 4G स्मार्टफोन खरेदी केल्यावर यूझर्सना तीन महिन्यांसाठी 4G डेटा आणि फ्री व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या मुंबई, दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सर्कलमधील CDMA ग्राहकांना आपली सर्व्हिस अपग्रेड करण्याची संमती आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमच्या करारानुसार यूझर्सना 4G सेवा मिळेल.