मुंबई: देशभरात आज 68 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. या उत्साहात सोशल मीडियाही सहभागी झाला आहे. गूगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

गूगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गूगलने खास डूडल बनवलं आहे.

तर ट्विटरवर #प्रजासत्ताकदिवस #RepublicDay  #गणतंत्रदिवस #HappyRepublicDay या हॅशटॅगसमोर तिरंगा झळकतो.

फेसबुकनेही आपल्या युझर्सना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा मेसेज दिला आहे.

26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्त दिल्लीतील राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडणार आहे. अतिरेक्यांचे कर्दनकाळ ठरलेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होणार आहे.

अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत.