मुंबई: गुगल पिक्सल स्मार्टफोनवर मर्यादित वेळेकरता तब्बल 10,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर ही सूट मिळणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 47,000 रु. आहे. तसेच यावर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.


फ्लिपकार्टच्या ऑफरनुसार, क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधून पिक्सल स्मार्टफोन खरेदी केल्यास दहा हजारापर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.

या स्मार्टफोनवर 10,000 रुपये सूट मिळणार असून इतर ऑफरचाही फायदा घेऊ शकतं. अॅक्सिस बँकेचच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टवरील एक्सचेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वाधिक सूट 23,000 रु. आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वाधिक सूट आयफोन 6 एस प्लसवर मिळणार आहे.

गुगल पिक्सलच्या 32 जीबी मॉडेलची किंमत 57,000 रु. आहे. तर 128 जीबी मॉडेलची किंमत 66,000 रु. आहे. गुगल पिक्सल स्मार्टफोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट देण्यात आली आहे.

गुगल पिक्सलच्या दोन्ही मॉडेलमध्ये एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि फिंगरप्रिंट सेंसरही आहे. 5 इंच आणि 5.5 इंच असे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. दोन्ही मॉडेलच्या फीचर्समध्ये फार काही फरक नाही.

दोन्ही मॉडेलमध्ये 12.3 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे.